शनिवार, ६ जुलै, २०२४

Neurologist म्हणजे काय? Neurologist Meaning in Marathi

जुलै ०६, २०२४

नमस्कार मित्रांनो या लेखात आपण Neurologist meaning in Marathi या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. सध्याचा धावपडीचा जगात शरीरात संबंधित अनेक अडचणी येतात. त्यातच Neurology संबंधित अनेक रोग पहायला मिळत आहे. ज्यामुळे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थावर परिणाम होत आहेत. त्याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. या लेखाद्वारे Neurology म्हणजे काय? आणि Neurologist Meaning in Marathi ह्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेणार आहोत. ज्यात Neurology व त्यातील रोग आणि Neurologist संबंधित माहीत घेणार आहोत.
 

 

 
neurologist meaning in marathi
neurologist meaning in marathi 

Neurologist Meaning in Marathi- Neurologist Information in MarathiNeurologist हे मेंदू आणि मज्जासंस्था यांच्या आजारावर उपचार करणारे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात. Neurologist ला शरीरातील असे भाग ज्यांमुळे मेंदू किंवा मजासंस्थांना नुकसान होऊ शकते, त्या भागांविषयी संपूर्ण ज्ञान असते. चक्कर येणे, कान वाजणे, स्मरणशक्तीचा त्रास, डोळ्यांची कमजोरता, ब्रेन स्ट्रोक अशा काही समस्या जाणवत असल्यास neurologist लगेच उपचार करू शकतो.मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टम या मेंदू, पाठीचा कणा व त्यांतील नसांचा समावेश होतो. हे शरीराचे केंद्रबिन्दु असल्याने यांमुळे असे काही आजार असतात जे शरीराचा इतर भागात देखील होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांची मेडिकल हिस्टरी व लहानपणातील आजार यांच्या योग्यप्रमाणे वापर करून ते निदान करत असतात. 

 

 

 

Neurology Meaning in Marathi- Neurology म्हणजे काय?

 

न्यूरोलॉजी ही एक वैद्यकीय शाखा आहे, ज्यात मज्जासंस्थेशी जुळलेल्या प्रत्येक आजारावर निदान आणि उपचार केले जाते. मज्जासंस्थेस शरीराचे कमांड सेंटर देखील म्हटले जाते. बाहेरील परिस्थितिनुसार शरीरास प्रतिसाद देण्याचे काम हे मज्जासंस्थेद्वारे होत असते. ह्यात आपल्या हालचाली, आपले विचार आणि शरीरातील इतर क्रियांवर नियंत्रण ठेवते.

 

 

 

 

What is Nervous System in marathi? मज्जासंस्था म्हणजे काय?मज्जासंस्था किंवा नर्वस सिस्टम शरीरातील इतर भागांत लक्ष केन्द्रित करते व त्यांना कंट्रोल करण्याचे काम करते. या आधारेच शरीरातील क्रिया घडत असतात. जाणूनबुजून किंवा न जाणता देखील सर्व कार्य हे मज्जासंस्थेद्वारे होत असते.

 

डोळे, कान, मेंदू, पाठीचा कणा, चव, वास व शरीरातील इतर भागातील चेतना देणारे अवयव हे नर्वस सिस्टमचे भाग आहेत. Nerve cells म्हणजेच मज्जातंतु पेशी यांच्या वापर करून संदेशांची देवाण-घेवाण करून शरीरातील अवयवांना प्रतिक्रिया करण्याचे काम हे नर्वस सिस्टमद्वारे होत असते. 

 

नर्वस सिस्टमचे दोन भाग आहेत. त्यांना इंग्रजीत CNS PNS असे म्हटले जाते.

 


neurologist meaning in marathi
CNS म्हणजेच Central Nervous System. यात मेंदू आणि पाठीचा कणा मज्जासंस्थेचा मुख्य भागाचा समावेश होतो. मेंदुच मज्जासंस्थेचा मुख्य भाग आहे. यामुळेच सर्व क्रिया आपण कंट्रोल करू शकतो. या व्यतिरिक्त आपले अवचेतन मन हे आपल्या मर्जी शिवाय शरीरास प्रतिसाद देण्यास मदत करते. यात श्वास घेणे, हृदय धडकणे अशा काही क्रियांचा समावेश होतो.

CNS मध्येच पाठीचा कणा हा एक महत्वाचा भाग आहे. याच द्वारे मेंदुपासून मिळणारे इलेक्ट्रिक सिंगल्स किंवा संदेशांची देवाण घेवाण होते. खूप सारे अवयव हे पाठीच्या कणामार्फत मेंदूशी संपर्क करत असल्याने हा मज्जासंस्थेतील हा एक महत्वाचा भाग आहे. उदा, जर कधी हाताला जखम झाली किंवा चटका बसला तर पाठीच्या कणाद्वारेच मेंदूपर्यंत इलेक्ट्रिक सिग्नलस हे पोहचवले जातात. आणि तेथूनच मेंदूचा प्रतिसाद देण्यात येतो की, जखम लागली किंवा चटका बसला म्हणून आपला हात मागे घेण्यात येतो. हे फक्त काही क्षणातच घडते.

 

 

PNS हा मज्जासंस्थेचा दूसरा भाग आहे. याचा अर्थ Peripheral Nervous System असा होतो. या मेंदू आणि पाठीचा कणा यांव्यतिरिक्त मज्जासंस्थेचे जे काही भाग आहेत त्यांचा समावेश होतो. त्यांना मेंदू किंवा पाठीच्या कण्याची जोडलेले असते. यात हात, पाय किंवा इतर काही अवयवांचा समावेश होतो. यात शरीराचा हालचाली जसे, चालणे, बोलणे अशा हालचालींचा समावेश होतो. तसेच ज्यावर आपले नियंत्रण नाही अशी कामे जसे की- हृदयाचे ठोके, पचन होणे ही कामे देखील PNS चा भाग आहे.

PNSCNS हे मज्जासंस्थेचे दोघी भाग जोडले गेलेलेच आहे. यात असलेल्या अवयवांचा प्रतिसादाचाद्वारे संपूर्ण मज्जासंस्था काम करत असते.  

                              .

 

 

 

 

Neurological Disorders in Marathi- न्यूरोलॉजी संबंधित कोणते रोग येतात?

 

मज्जासंस्था किंवा त्यातील पेशींसंबंधित खूप काही रोग होत असतात. त्यांना neurologist द्वारे बरे केले जाऊ शकते. Montana Government च्या एका लेखाच्या आधारे जवळ जवळ 600 Neurological Disorders आहेत.

त्यांपैकी काही Neurology संबंधित रोग खालील खालीलप्रमाणे आहेत.

 

 

अकोस्टिक न्यूरोमा

पाठीचा कण्यात दुखापत

ALS (Lou Gehrig's Disease)

अल्झायमर

एन्युरिझम

Anterior Ischemic Optic Neuropathy

चिंता विकार(Anxiety)

ॲफेसिया

धमनी विकृती (एव्हीएम)

ॲस्ट्रोसाइटोमा

ॲटॅक्सिया

लक्ष तूट विकार

पाठ आणि मान दुखणे

समतोल विकार

द्विध्रुवीय विकार

बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर

ब्रॅचियल प्लेक्सस इजा

ब्रेन एन्युरिझम

मेंदूचा कर्करोग

ब्रेन ट्यूमर

कॅरोटीड धमनी रोग (कॅरोटीड स्टेनोसिस)

कार्पल टनल सिंड्रोम

कॅव्हर्नस विकृती (कॅव्हर्नोमा)

सेरेब्रल पाल्सी

ग्रीवा रेडिक्युलोपॅथी

चीयरी विकृती

कोंड्रोसारकोमा

कॉर्डोमा

तीव्र वेदना

सर्कॅडियन लय विकार

क्लॉडिकेशन

आघात

क्रॅनिओफॅरिन्जिओमा

क्यूबिटल टनेल सिंड्रोम

डीजनरेटिव्ह डिस्क रोग

नैराश्य(डिप्रेशन)

मधुमेह न्यूरोपॅथी

डिस्क हर्नियेशन

दुहेरी दृष्टी

ड्युरल आर्टेरिओव्हेनस फिस्टुला (DAVF)

डायस्टोनिया

अपस्मार

फायब्रोमायल्जिया

फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया

ग्लिओब्लास्टोमा

ग्लिओमास

गुइलेन-बॅरे सिंड्रोम

डोक्याला दुखापत

डोकेदुखी

हायड्रोसेफलस

दाहक न्यूरोलॉजिक रोग

निद्रानाश

इंट्राक्रॅनियल रक्तस्त्राव

लंबर रेडिक्युलोपॅथी

लंबर स्पाइनल स्टेनोसिस

मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर

मेनिन्जिओमा

मायग्रेन

मोयामोया रोग

मल्टिपल स्क्लेरोसिस

स्नायुंचा विकृती

मायस्थेनिया ग्रॅव्हिस

नार्कोलेप्सी/अतिनिद्रा

मज्जासंस्थेचे विकार

न्यूरो-संसर्गजन्य रोग

एचआयव्ही/एड्सची न्यूरोलॉजिकल गुंतागुंत

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD)

ऑलिगोडेंड्रोग्लिओमा

ऑप्टिक न्यूरिटिस

पॅरासोम्निया

पार्किन्सन रोग

पिट्यूटरी ट्यूमर

स्यूडोट्यूमर सेरेब्री

अस्वस्थ पाय सिंड्रोम

स्किझोफ्रेनिया

स्कोलियोसिस

सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर

जप्ती विकार

कवटी बेस ट्यूमर

स्लिप डिस्क

मणक्याची दुखापत

पाठीचा कण्यात गाठ होते.

स्पाइनल डीकंप्रेशन

पाठीचा कणा विकृती

स्पाइनल स्टेनोसिस

मणक्याचे ट्यूमर

स्पॉन्डिलोलिस्थेसिस

स्ट्रोक

रक्तस्त्राव

टेम्पोरल आर्टेरिटिस

टेथर्ड कॉर्ड

थायरॉईड डोळा रोग

अत्यंत क्लेशकारक मेंदूला दुखापत

ट्रायजेमिनल मज्जातंतुवेदना

वॉन हिप्पल-लँडाउ सिंड्रोम

 

हे काही आजार Neurology अंतर्गत येत असतात. ज्याचे उपचार Neurologist किंवा Neurosurgeon करत असतात.

 

 

 

 

How to Become Neurologist in Marathi? Neurologist कसे बनावे?Neurologist हे मज्जासंस्थेशी सबंधित रोगांवर उपचार करणारा एक स्पेशलिस्ट डॉक्टर असतात. तुम्ही Neurologist कशाप्रकारे बनता येईल या विषयी माहिती दिली आहे.

 

12 वीत चांगले मार्क्स मिळवणे

Neurogoly चा डॉक्टर बनण्यासाठी 12 वी च्या परीक्षेत विज्ञान शाखेतून चांगले गुण मिळवणे गरजेचे आहे. मेडीकल फील्डमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी physics, chemistrybiology या विषयांत 50% पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे.

NEET एक्झॅम मध्ये चांगली रॅंक मिळवणे

12 वी च्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्यासाठी NEET किंवा AIIMS सारख्या प्रवेश परीक्षा देयला पडतात. यांच्या अभ्यासक्रमामुळे MBBS किंवा इतर Doctorate पदवी चा अभ्यास करतांना फायद्याचा ठरतो. NEET किंवा AIIMS या स्पर्धा परीक्षा असून यांत चांगले गुण मिळवून चांगले रॅंक मिळवणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकते.

MBBS कोर्स पूर्ण करणे

Neet एक्झॅम पास केल्यानंतर Neurologist बनण्यासाठी 5 वर्ष 6 महिन्याचा MBBS कोर्स

करणे गरजेचे असते. MBBS चा अभ्यासक्रम व अनुभव Neurology साठी मदत करू शकतो.

Neurology त स्पेशलायजेशन करणे.

MBBS डॉक्टर बनून Neurology मध्ये Specialization केले जाऊ शकते. या साठी Neurology ही MD (Doctor of Medicine)DNB (Diplomate of National Board) यांत केली जाऊ शकते.

 

 


 

अशा प्रकारे तुम्ही 12 वी नंतर Neurologist बनण्याचा प्रवास पूर्ण करू शकता. तसेच Neurosurgeon देखील बनू शकता. Neurologist हे मज्जासंस्थेसंबंधित आजारावर ट्रीटमेंट करत असतात. तर Neurosurgeon हे Neurology संबंधित आजारांवर surgery करत असतात. यासाठी देखील एक स्पेशलायजेशन कोर्स असतात. .

 

 

 

 


तर मित्रांनो अशाप्रकारे आपण Neurology संबंधित माहिती पाहिली. यात Neurology Meaning in Marathi, Neurologist Meaning in Marathi अशा प्रश्नाची उत्तरे देण्यात आली. जर तुम्हाला Neurology संबंधित हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. अशा माहिती साठी आमच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा. धन्यवाद!

 

 


सोमवार, १ जुलै, २०२४

MBA Information in Marathi- एम.बी.ए विषयी संपूर्ण माहिती

जुलै ०१, २०२४

 MBA Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, MBA Information in Marathi- एम.बी.ए विषयी संपूर्ण माहिती या लेखात आपण एमबीए कोर्स विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात एक प्रतिष्ठित पद प्राप्त करण्याची जिद्द असते. त्यासाठी सर्व विद्यार्थी हे विविध प्रकारच्या शाखेत प्रवेश घेत असतात. काहीजण डॉक्टर तर काहीजन इंजिनीअर बनायचे स्वप्न पाहतात. तर काहीजण विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून एक चांगली सरकारी नोकरी मिळवण्याची जिद्द बाळगतात. परंतु, असेही काही विद्यार्थी असतात. के ग्रॅजुएशन म्हणजेच पदवीधर झाल्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट मध्ये करियर करण्याचे स्वप्न पाहतात. आणि त्यासाठी MBA ह्या कोर्सला प्रवेश घेतात. परंतु, बहुतेक विद्यार्थ्यांना किंवा त्यांचा पालकांना MBA विषयी माहीत नसते. त्या सर्वांसाठी हा लेख महत्वाचा आहे. MBA म्हणजे काय?  या सर्व प्रश्नांचे उत्तर आम्ही ह्या लेखात दिले आहे. चला तर पाहुयात!


mba Information in marathi
mba Information in marathi


एमबीए काय आहे? MBA Course Information in Marathi

 

एमबीए चा अर्थ किंवा पूर्ण रूप Master Of Business Administration असा होतो. जेही बिजनेस मॅनेजमेंट मध्ये करियर करू इच्छित असतील ते MBA मार्फत आपले करियर करू शकतात.

एमबीए ही जगातील सर्वात प्रसिद्ध डिग्री(पदवी) पैकी एक आहे. भारतातील हजारो विद्यार्थी पदवीधर होताच या कोर्समध्ये कोणत्याही क्षेत्रात नौकरी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असल्यास एमबीए केल्याने तुम्हाला प्रथम प्राधान्य मिळू शकते. बिजनेस किंवा कंपनीच्या कामकाजाविषयी जास्त ज्ञान असल्याने इन्कम शीट वर चांगले परिणाम मिळवून देण्याचे काम एमबीए धारक करू शकता.

तुम्हाला एखाद्या क्षेत्रात चांगले करियर करायचे असल्यास त्या क्षेत्रसंबंधित एमबीए कोर्स करून तुम्ही एक उच्च पद मिळवू शकता. यासाठी एखाद्या प्रतिष्ठित एमबीए कॉलेज मध्ये अॅडमिशन घेऊन दिलेल्या कलावधीत कोर्स पूर्ण करणे महत्वाचे आहे. एमबीए साठी काही पात्रता निकष व प्रवेश परीक्षा देखील असतात. त्याविषयी माहिती पुढील काही परिच्छेदात नक्की पहा.

 


History About MBA course in Marathi- एमबीए विषयी इतिहास

विसाव्या शतकाच्या सुरुवातील अमेरिकेत औद्योगिकीकरणास सुरुवात झाली आणि फायनॅन्स, अकाऊंटिंग व बिजनेस मॅनेजमेंट क्षेत्रात कामगारांची गरज भासत असल्याने त्याचे प्रशिक्षण देणे देखील महत्वाचे होते. पहिल्यांदा 1908 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनने 80 विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा प्रशिक्षणाद्वारे ही डिग्री देण्यास सुरुवात केली. खरतर 1881 साली पेन्सिविलिया मध्ये व्हार्टन बिजनेस स्कूल ही पहिली बिजनेस स्कूल होतीत्यांनंतर हळूहळू जगभरात बिजनेस स्कूल द्वारे हा कोर्स दिला जातो. १९५० मध्ये, कॅनडातील वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठ हे अमेरिकेबाहेरील एमबीए कोर्स पुरवणारे पहिले विद्यापीठ बनले. 1957 मध्ये फ्रांसमधील INSEAD येथे आजचे सर्वात प्रतिष्ठित व युरोपातील एमबीए कोर्स प्रदान करणारे पहिले विद्यापीठ बनले. 1955 साली आशिया मध्ये पहिले एमबीए कोर्स पुरवणारे विद्यापीठ हे पाकिस्तानमधील कराची विद्यापीठ होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

Types of MBA course in Marathi- MBA कोर्सचे के प्रकार

 

एमबीए चे प्रकार हे तुमचा अनुभव व विषयातील ज्ञान किती आहे? यावर अवलंबून आहे. एमबीए डिग्री मिळवण्यासाठी तुम्हाला आधी असलेल्या ज्ञानानुसार किती वेळ लागेल यानुसार काही प्रकार खाली दिलेले आहेत.


Full time MBA

या प्रकारच्या एमबीए कोर्स करण्यासाठी तुम्हाला पूर्ण वेळ अभ्यास केंद्र किंवा कॉलेजमध्ये जावे लागते. व दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. फुल्ल टाइम एमबीए करतांना कोणीतीही नौकरी किंवा व्यवसाय आपण करू शकत नाही. जेणेकरून कॉलेज करण्यास व अभ्यास करण्यास वेळ मिळून जातो.

Part Time MBA

पार्ट टाइम एमबीए करतांना आपल्याला आपली नौकरी किंवा व्यवसाय सोडण्याची गरज नसते. या प्रकारच्या एमबीए चे पॅटर्न देखील फूल टाइम एमबीए सारखेच असते. तसेच हे त्यापेक्षा कमी खर्चात होते व नौकरी करणार्‍या उमेदवारांसाठी सोयिस्कर असते.

Online MBA

या एमबीए कोर्स द्वारे घरबसल्या कोर्स पूर्ण केला जाऊ शकतो. तुमचे वेळापत्रक व्यस्त असल्यास व कॉलेज मध्ये जाण्यास अडचण असल्यास तुम्ही एमबीए साठी Online Mode निवडू शकता. या साठी पदवीधर असणे महत्वाचे असते तसेच पदवीत सामान्य कॅटेगरी साठी कमीतकमी 50% मार्क्स व रिजर्व कॅटेगरी साठी कमीतकमी 45% मार्क्स असणे गरजेचे असते.

Distance MBA

यात एमबीए उमेदवार क्लासेसमध्ये शारीरिक रित्या उपस्थित न राहता एमबीए कोर्स पूर्ण करू शकतो. नौकरी करत असलेल्या उमेदवारांना या प्रकारचा कोर्स सोयिस्कर असू शकतो. या कोर्सचा कलावधी 2 ते 5 वर्ष एवढा राहू शकतो. तसेच या साठी देखील पदवीधर असले व त्यात 50% कमीतकमी गुण असणे व 2 ते 3 वर्षांचा कामात अनुभव असणे गरजेचे असते.


Global MBA

व्यवसायाला आंतर्राष्ट्रीय दृष्टीकोणातून पुढे नेण्याचे ज्ञान हवे असल्यास या प्रकारचा एमबीए कोर्स फायद्याचा राहू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर कशाप्रकारे व्यवसाय वाढवता येईल याचे ज्ञान या प्रकारचा एमबीए द्वारे मिळवले जाते. 1 ते 2 वर्षाचा हा कोर्स असून पार्ट-टाइम, फूल टाइम, ऑनलाइन व distance एमबीए द्वारे देखील हा कोर्स पूर्ण केला जाऊ शकतो.

 

 

 

How to Do MBA course? भारतात एमबीए कसे करावे?

 

एमबीए करण्यासाठी सर्वात प्रथम एक बॅचलर डिग्री असणे महत्वाचे असते. बहुतेक विद्यापीठ त्याची मागणी करतात. त्यामुळे 12वी वर्गानंतर पदवीधर होणे महत्वाचे आहे. पदवी सोबतच त्यातील चांगले गुण मिळवणे देखील आवश्यक आहे.

बहुतेक एमबीए कोर्स साठी कामातील अनुभवाची अट ठेवली जाते. विद्यापीठानुसार किंवा निवळलेल्या क्षेत्रानुसार ती वेगवेगळी असू शकते.

एमबीए साठी देखील प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. यात CAT, MAT, SNAP, XAT, , NMAT अशा प्रकारच्या परीक्षांचा समावेश आहे. यांत चांगले मार्क्स मिळवून MBA साठी पात्र होता येते.

प्रवेश परीक्षेत नंतर अॅडमिशन मिळाल्यास पार्ट-टाइम, फूल टाइम, ऑनलाइन व distance यांपैकी एमबीए प्रोग्रॅम्स निवडण्यात येते. त्यानंतर पुढे अर्ज प्रक्रिया करण्यात येते. यासाथी आवश्यक ते डॉक्युमेंट्स मागवण्यात येतात. त्यानंतर मुलाखतीद्वारे एमबीए प्रोग्रॅम्स मध्ये तुमची नोंद होते.

 
MBA Specialization in India- एमबीए मधील काही डिमांडिंग फील्ड


खूप काही एमबीए स्पेशलायजेशन फील्ड आहेत. ज्यांद्वारे त्यासंबंधित क्षेत्रांत बिजनेस स्किल्स डेवलप करवण्यात येतात. या साठी उमेदवार एमबीए ला अॅडमिशन घेऊन एक स्पेशल फील्ड निवडू शकता. या साठी आपल्या करियर संबंधित फील्ड निवळणे महत्वाचे आहे. हा निर्णय खूप काळजीपूर्वक घेण्यात यावा. काही एमबीए स्पेशल फील्ड खाली दिलेल्या आहे. 

·         

 1. MBA Big Data Analytics/ Data Science/ Business Analytics
 2. MBA Dual Country Program
 3. MBA in Agri-Business Management
 4. MBA in Banking & Financial Services
 5. MBA in Energy Management
 6. MBA in Entrepreneurship
 7. MBA in Family Managed Business
 8. MBA in Healthcare Management
 9. MBA in Human Resource Management
 10. MBA in Infrastructure Management
 11. MBA in Insurance Business Management
 12. MBA in International Business
 13. MBA in Logistics & Supply Chain Management
 14. MBA in Marketing
 15. MBA in Operations Management
 16. MBA in Pharmaceutical Management
 17. MBA in Retail Management
 18. MBA in Rural Management
 19. MBA in Sustainability Management


 MBA jobs in Marathi- एमबीए नंतर नौकरी करायच्या संधी


एमबीए केल्यानंतर तुम्ही विविध क्षेत्रात नौकरी प्राप्त करू शकता. अशा खूप सार्‍या फील्ड आहे जे एमबीए धारकांना इतर उमेदवारांपेक्षा जास्त प्राधान्य देतात. तुम्ही तुमच्या स्पेशलायजेशन संबंधित क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रात देखील नौकरी करू शकता.

 

 

Budget Analyst: बजेट विश्लेषक

Business Intelligence Analyst: व्यवसाय बुद्धिमत्ता विश्लेषक

Business Operations Manager: व्यवसाय संचालन व्यवस्थापक

Chief Executive Officer: मुख्य कार्यकारी अधिकारी

Chief Financial Officer: मुख्य वित्तीय अधिकारी

Financial Analyst: वित्तीय विश्लेषक

Financial Manager: वित्तीय व्यवस्थापक

Human Resources Manager: मानव संसाधन व्यवस्थापक

Information Technology Director: माहिती तंत्रज्ञान संचालक

Investment Banker: गुंतवणूक बँकर

Logistic Manager: लॉजिस्टिक व्यवस्थापक

Management Consultant: व्यवस्थापन सल्लागार

Marketing Director: विपणन संचालक

Marketing Manager: विपणन व्यवस्थापक

Medical Director: वैद्यकीय संचालक

Operation Analyst: ऑपरेशन विश्लेषक

Policy Analyst: धोरण विश्लेषक

Product Manager: उत्पादन व्यवस्थापक

Purchasing Manager: खरेदी व्यवस्थापक

Sales Director: विक्री संचालक

 

What can you earn after MBA in Marathi? एमबीए नंतर किती पगार मिळू शकतो?बहुतेक MBA धारक उच्च पद मिळवण्यासाठी व चांगली सॅलरी मिळवण्यासाठी एमबीए कोर्स करत असतात. Linkedin च्या MBA Salary in India ह्या लेखात सांगितल्याप्रमाणे 7-12 लाख एवढा पगार एमबीए धारकांना मिळू शकतो व 70 ते 100 एलपीए (लाख पर एनम") एवढा वाढू शकतो. परंतु त्यासाठी आपण निवडलेले क्षेत्र व आपले ज्ञान यांमुळे पगारात फरक दिसून येऊ शकतो.

 

 

 

तर मित्रांनो. MBA हा सध्याचा सर्वात डिमांडिंग कोर्स पैकी एक आहे. या कोर्स मुळे व्यवसायासास पुढे नेण्यासाठी आवश्यक असे कौशल्य शिकता येते. MBA विषयी या लेखात तुम्हाला आवश्यक ती माहिती मिळाली असेल अशी आम्हाला आशा आहे. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. तसेच तुमचे MBA information in Marathi ह्या लेखासंबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट द्वारे नक्की विचारा. 


रविवार, १९ मे, २०२४

Rich Dad Poor Dad Marathi Book PDF Download(*free)

मे १९, २०२४

Rich Dad Poor Dad Marathi Pdf

 

 

मित्रांनो, ह्या लेखात आपण पैशांचा ज्ञान देणारे अतिशय प्रसिद्ध व महत्वाचे पुस्तक रिच डॅड पूअर डॅड विषयी माहीती घेणार आहोत. ह्या लेखाद्वारे

आपल्या आजूबाजूस अनेक लोक राहतात. काही श्रीमंत, काही मध्यम वर्गीय, काही मागासवर्गीय. सर्व आपापले जीवन आपल्या जवळ असलेल्या पैशांच्या आधारे जगत असतात. सर्वांच्या आवडी-निवडी, शौक, जीवन जगण्याची पद्धत ही पैशांच्या आधारेच ठरत असते. गरीब लोक कमी पैशांत अति आवश्यक गरजा पूर्ण करून जीवन जगतात तर, मध्यम वर्गीय गरिबांपेक्षा थोडे चांगले व सोयिस्कर जीवन जगत असतात. परंतु, मध्यम वर्गीय कुटुंबांना देखील पैशांच्या बाबतीत तितिकीच कटकट असते, जेवढी की गरीबांना किंवा मागासवर्गीय कुटुंबांना! पैसा येतो परंतु, त्याचे नियोजन हे उत्तम प्रकारे करत नसल्याने अनेक मागास तसेच मध्यम वर्गीय कुटुंबांना अनेक वेळा आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. पैशांच्या ह्याच नियोजनाचे ज्ञान देणारे सर रोबर्ट कियोसाकी यांचे पुस्तक म्हणजेच “रिच डॅड पूअर डॅड”. ह्या पुस्तकाद्वारे असे अनेक-जण आहेत, ज्यांनी पैशांविषयी आपला दृष्टीकोण बदलला आणि पैशांचा याच दृष्टीकोनामुळे कमी पैशांत व पैशांचे व्यवस्थित व्यवस्थापन करून एक चांगले जीवन जगत आहेत. आपण देखील असाच प्रकारे पैशांचे नियोजनाच्या काही महत्वाच्या बाबींचा वापर करून योग्य बचत व योग्य गुंतवणूक करून कशाप्रकरे संपत्ति(property) वाढवू शकतो, हे पुस्तक आपणास शिकवते. ह्यासाठी ह्या लेखाद्वारे आपण, Rich dad poor dad Marathi pdf फ्री मध्ये डाऊनलोड किंवा पुस्तकाची ऑनलाइन खरेदी कशी करू शकता? हे पाहुयात.  

 

Rich Dad Poor Dad Marathi Book PDF Download


Rich Dad Poor Dad Marathi Book PDF DownloadRich Dad Poor Dad Marathi PDF overview

Rich Dad Poor Dad Marathi PDF ही रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी लिहलेले पुस्तक “रिच डॅड पूअर डॅड” याचे पीडीएफ रूपांतर आहे. पुस्तकात असलेले परिच्छेद, आकृती व चित्रांसारखेच हुबेहूब पीडीएफ मध्ये पहायला मिळतात.

 

पुस्तकाचे नाव:- रिच डॅड पूअर डॅड

लेखक:- रिच डॅड पूअर डॅड

प्रकाशन:- Manjul Publishing House Pvt. Ltd

एकूण पाने:- 190

PDF साइज:- 1.8 MB


 

 Rich Dad Poor Dad Marathi Book Overviewरिच डॅड पुअर डॅड हे रोबार्ट डी. कियोसाकी यांनी पैशांच्या व्यवस्थापणाबद्दल लिहलेले एक अतिशय महत्वाचे पुस्तक आहे. पैशांचे व्यवस्थापन कसे करावे? या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणारे हे पुस्तक 1997 साली प्रकाशित झाले आणि संपत्तिच्या बाबतीत ज्ञान देणारे हे पुस्तक कमी वेळातच खूप प्रसिद्ध झाले.


 रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक मुख्य:ता लेखकांच्या वडिलांच्या पैशांच्या बाबतीत असलेल्या ज्ञानाविषयी माहिती देते. लेखकांचे एक वडील ज्यांना लेखक पूअर डॅड असे म्हणतात आणि त्यांचा मित्राचे वडील त्यांना देखील लेखक वडील असे मानतात आणि रिच डॅड असे संबोधता. या दोन्ही रिच आणि पूअर डॅड. यांच्याकडील पैशांच्या विचारासंबंधित हे पुस्तक आहे.

                 

 
तर मित्रांनो पैशांच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या ह्या पुस्तकाविषयी माहिती तुम्हाला आवडली असेल. तुम्ही ह्याची पीडीएफ नक्की डाऊनलोड करून वाचा. जर आपणास हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. धन्यवाद!