शनिवार, ६ जुलै, २०२४

Neurologist म्हणजे काय? Neurologist Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो या लेखात आपण Neurologist meaning in Marathi या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. सध्याचा धावपडीचा जगात शरीरात संबंधित अनेक अडचणी येतात. त्यातच Neurology संबंधित अनेक रोग पहायला मिळत आहे. ज्यामुळे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थावर परिणाम होत आहेत. त्याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. या लेखाद्वारे Neurology म्हणजे काय? आणि Neurologist Meaning in Marathi ह्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेणार आहोत. ज्यात Neurology व त्यातील रोग आणि Neurologist संबंधित माहीत घेणार आहोत.
 

 

 
neurologist meaning in marathi
neurologist meaning in marathi 

Neurologist Meaning in Marathi- Neurologist Information in MarathiNeurologist हे मेंदू आणि मज्जासंस्था यांच्या आजारावर उपचार करणारे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात. Neurologist ला शरीरातील असे भाग ज्यांमुळे मेंदू किंवा मजासंस्थांना नुकसान होऊ शकते, त्या भागांविषयी संपूर्ण ज्ञान असते. चक्कर येणे, कान वाजणे, स्मरणशक्तीचा त्रास, डोळ्यांची कमजोरता, ब्रेन स्ट्रोक अशा काही समस्या जाणवत असल्यास neurologist लगेच उपचार करू शकतो.मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टम या मेंदू, पाठीचा कणा व त्यांतील नसांचा समावेश होतो. हे शरीराचे केंद्रबिन्दु असल्याने यांमुळे असे काही आजार असतात जे शरीराचा इतर भागात देखील होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांची मेडिकल हिस्टरी व लहानपणातील आजार यांच्या योग्यप्रमाणे वापर करून ते निदान करत असतात. 

 

 

 

Neurology Meaning in Marathi- Neurology म्हणजे काय?

 

न्यूरोलॉजी ही एक वैद्यकीय शाखा आहे, ज्यात मज्जासंस्थेशी जुळलेल्या प्रत्येक आजारावर निदान आणि उपचार केले जाते. मज्जासंस्थेस शरीराचे कमांड सेंटर देखील म्हटले जाते. बाहेरील परिस्थितिनुसार शरीरास प्रतिसाद देण्याचे काम हे मज्जासंस्थेद्वारे होत असते. ह्यात आपल्या हालचाली, आपले विचार आणि शरीरातील इतर क्रियांवर नियंत्रण ठेवते.

 

 

 

 

What is Nervous System in marathi? मज्जासंस्था म्हणजे काय?मज्जासंस्था किंवा नर्वस सिस्टम शरीरातील इतर भागांत लक्ष केन्द्रित करते व त्यांना कंट्रोल करण्याचे काम करते. या आधारेच शरीरातील क्रिया घडत असतात. जाणूनबुजून किंवा न जाणता देखील सर्व कार्य हे मज्जासंस्थेद्वारे होत असते.

 

डोळे, कान, मेंदू, पाठीचा कणा, चव, वास व शरीरातील इतर भागातील चेतना देणारे अवयव हे नर्वस सिस्टमचे भाग आहेत. Nerve cells म्हणजेच मज्जातंतु पेशी यांच्या वापर करून संदेशांची देवाण-घेवाण करून शरीरातील अवयवांना प्रतिक्रिया करण्याचे काम हे नर्वस सिस्टमद्वारे होत असते. 

 

नर्वस सिस्टमचे दोन भाग आहेत. त्यांना इंग्रजीत CNS PNS असे म्हटले जाते.

 


neurologist meaning in marathi
CNS म्हणजेच Central Nervous System. यात मेंदू आणि पाठीचा कणा मज्जासंस्थेचा मुख्य भागाचा समावेश होतो. मेंदुच मज्जासंस्थेचा मुख्य भाग आहे. यामुळेच सर्व क्रिया आपण कंट्रोल करू शकतो. या व्यतिरिक्त आपले अवचेतन मन हे आपल्या मर्जी शिवाय शरीरास प्रतिसाद देण्यास मदत करते. यात श्वास घेणे, हृदय धडकणे अशा काही क्रियांचा समावेश होतो.

CNS मध्येच पाठीचा कणा हा एक महत्वाचा भाग आहे. याच द्वारे मेंदुपासून मिळणारे इलेक्ट्रिक सिंगल्स किंवा संदेशांची देवाण घेवाण होते. खूप सारे अवयव हे पाठीच्या कणामार्फत मेंदूशी संपर्क करत असल्याने हा मज्जासंस्थेतील हा एक महत्वाचा भाग आहे. उदा, जर कधी हाताला जखम झाली किंवा चटका बसला तर पाठीच्या कणाद्वारेच मेंदूपर्यंत इलेक्ट्रिक सिग्नलस हे पोहचवले जातात. आणि तेथूनच मेंदूचा प्रतिसाद देण्यात येतो की, जखम लागली किंवा चटका बसला म्हणून आपला हात मागे घेण्यात येतो. हे फक्त काही क्षणातच घडते.

 

 

PNS हा मज्जासंस्थेचा दूसरा भाग आहे. याचा अर्थ Peripheral Nervous System असा होतो. या मेंदू आणि पाठीचा कणा यांव्यतिरिक्त मज्जासंस्थेचे जे काही भाग आहेत त्यांचा समावेश होतो. त्यांना मेंदू किंवा पाठीच्या कण्याची जोडलेले असते. यात हात, पाय किंवा इतर काही अवयवांचा समावेश होतो. यात शरीराचा हालचाली जसे, चालणे, बोलणे अशा हालचालींचा समावेश होतो. तसेच ज्यावर आपले नियंत्रण नाही अशी कामे जसे की- हृदयाचे ठोके, पचन होणे ही कामे देखील PNS चा भाग आहे.

PNSCNS हे मज्जासंस्थेचे दोघी भाग जोडले गेलेलेच आहे. यात असलेल्या अवयवांचा प्रतिसादाचाद्वारे संपूर्ण मज्जासंस्था काम करत असते.  

                              .

 

 

 

 

Neurological Disorders in Marathi- न्यूरोलॉजी संबंधित कोणते रोग येतात?

 

मज्जासंस्था किंवा त्यातील पेशींसंबंधित खूप काही रोग होत असतात. त्यांना neurologist द्वारे बरे केले जाऊ शकते. Montana Government च्या एका लेखाच्या आधारे जवळ जवळ 600 Neurological Disorders आहेत.

त्यांपैकी काही Neurology संबंधित रोग खालील खालीलप्रमाणे आहेत.

 

 

अकोस्टिक न्यूरोमा

पाठीचा कण्यात दुखापत

ALS (Lou Gehrig's Disease)

अल्झायमर

एन्युरिझम

Anterior Ischemic Optic Neuropathy

चिंता विकार(Anxiety)

ॲफेसिया

धमनी विकृती (एव्हीएम)

ॲस्ट्रोसाइटोमा

ॲटॅक्सिया

लक्ष तूट विकार

पाठ आणि मान दुखणे

समतोल विकार

द्विध्रुवीय विकार

बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर

ब्रॅचियल प्लेक्सस इजा

ब्रेन एन्युरिझम

मेंदूचा कर्करोग

ब्रेन ट्यूमर

कॅरोटीड धमनी रोग (कॅरोटीड स्टेनोसिस)

कार्पल टनल सिंड्रोम

कॅव्हर्नस विकृती (कॅव्हर्नोमा)

सेरेब्रल पाल्सी

ग्रीवा रेडिक्युलोपॅथी

चीयरी विकृती

कोंड्रोसारकोमा

कॉर्डोमा

तीव्र वेदना

सर्कॅडियन लय विकार

क्लॉडिकेशन

आघात

क्रॅनिओफॅरिन्जिओमा

क्यूबिटल टनेल सिंड्रोम

डीजनरेटिव्ह डिस्क रोग

नैराश्य(डिप्रेशन)

मधुमेह न्यूरोपॅथी

डिस्क हर्नियेशन

दुहेरी दृष्टी

ड्युरल आर्टेरिओव्हेनस फिस्टुला (DAVF)

डायस्टोनिया

अपस्मार

फायब्रोमायल्जिया

फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया

ग्लिओब्लास्टोमा

ग्लिओमास

गुइलेन-बॅरे सिंड्रोम

डोक्याला दुखापत

डोकेदुखी

हायड्रोसेफलस

दाहक न्यूरोलॉजिक रोग

निद्रानाश

इंट्राक्रॅनियल रक्तस्त्राव

लंबर रेडिक्युलोपॅथी

लंबर स्पाइनल स्टेनोसिस

मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर

मेनिन्जिओमा

मायग्रेन

मोयामोया रोग

मल्टिपल स्क्लेरोसिस

स्नायुंचा विकृती

मायस्थेनिया ग्रॅव्हिस

नार्कोलेप्सी/अतिनिद्रा

मज्जासंस्थेचे विकार

न्यूरो-संसर्गजन्य रोग

एचआयव्ही/एड्सची न्यूरोलॉजिकल गुंतागुंत

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD)

ऑलिगोडेंड्रोग्लिओमा

ऑप्टिक न्यूरिटिस

पॅरासोम्निया

पार्किन्सन रोग

पिट्यूटरी ट्यूमर

स्यूडोट्यूमर सेरेब्री

अस्वस्थ पाय सिंड्रोम

स्किझोफ्रेनिया

स्कोलियोसिस

सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर

जप्ती विकार

कवटी बेस ट्यूमर

स्लिप डिस्क

मणक्याची दुखापत

पाठीचा कण्यात गाठ होते.

स्पाइनल डीकंप्रेशन

पाठीचा कणा विकृती

स्पाइनल स्टेनोसिस

मणक्याचे ट्यूमर

स्पॉन्डिलोलिस्थेसिस

स्ट्रोक

रक्तस्त्राव

टेम्पोरल आर्टेरिटिस

टेथर्ड कॉर्ड

थायरॉईड डोळा रोग

अत्यंत क्लेशकारक मेंदूला दुखापत

ट्रायजेमिनल मज्जातंतुवेदना

वॉन हिप्पल-लँडाउ सिंड्रोम

 

हे काही आजार Neurology अंतर्गत येत असतात. ज्याचे उपचार Neurologist किंवा Neurosurgeon करत असतात.

 

 

 

 

How to Become Neurologist in Marathi? Neurologist कसे बनावे?Neurologist हे मज्जासंस्थेशी सबंधित रोगांवर उपचार करणारा एक स्पेशलिस्ट डॉक्टर असतात. तुम्ही Neurologist कशाप्रकारे बनता येईल या विषयी माहिती दिली आहे.

 

12 वीत चांगले मार्क्स मिळवणे

Neurogoly चा डॉक्टर बनण्यासाठी 12 वी च्या परीक्षेत विज्ञान शाखेतून चांगले गुण मिळवणे गरजेचे आहे. मेडीकल फील्डमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी physics, chemistrybiology या विषयांत 50% पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे.

NEET एक्झॅम मध्ये चांगली रॅंक मिळवणे

12 वी च्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्यासाठी NEET किंवा AIIMS सारख्या प्रवेश परीक्षा देयला पडतात. यांच्या अभ्यासक्रमामुळे MBBS किंवा इतर Doctorate पदवी चा अभ्यास करतांना फायद्याचा ठरतो. NEET किंवा AIIMS या स्पर्धा परीक्षा असून यांत चांगले गुण मिळवून चांगले रॅंक मिळवणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकते.

MBBS कोर्स पूर्ण करणे

Neet एक्झॅम पास केल्यानंतर Neurologist बनण्यासाठी 5 वर्ष 6 महिन्याचा MBBS कोर्स

करणे गरजेचे असते. MBBS चा अभ्यासक्रम व अनुभव Neurology साठी मदत करू शकतो.

Neurology त स्पेशलायजेशन करणे.

MBBS डॉक्टर बनून Neurology मध्ये Specialization केले जाऊ शकते. या साठी Neurology ही MD (Doctor of Medicine)DNB (Diplomate of National Board) यांत केली जाऊ शकते.

 

 


 

अशा प्रकारे तुम्ही 12 वी नंतर Neurologist बनण्याचा प्रवास पूर्ण करू शकता. तसेच Neurosurgeon देखील बनू शकता. Neurologist हे मज्जासंस्थेसंबंधित आजारावर ट्रीटमेंट करत असतात. तर Neurosurgeon हे Neurology संबंधित आजारांवर surgery करत असतात. यासाठी देखील एक स्पेशलायजेशन कोर्स असतात. .

 

 

 

 


तर मित्रांनो अशाप्रकारे आपण Neurology संबंधित माहिती पाहिली. यात Neurology Meaning in Marathi, Neurologist Meaning in Marathi अशा प्रश्नाची उत्तरे देण्यात आली. जर तुम्हाला Neurology संबंधित हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. अशा माहिती साठी आमच्या ब्लॉगला सतत भेट देत रहा. धन्यवाद!

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा