PHD information in Marathi- पीएचडीविषयी संपूर्ण माहिती

Phd information in Marathi

 

मित्रांनो, ह्या लेखाच्या माध्यमातून आपण phd information in marathi पाहणार आहोत. सध्या शैक्षणिक क्षेत्रात PHD विषयी खूप चर्चा होत आहे. पीएचडी म्हणजे सर्वात मोठे शिक्षण असे म्हटले जाते. कोणत्यातरी एका विषयात PHD करून एखाद्या मोठ्या पदावर किंवा एखाद्या चांगल्या कॉलेजात प्रोफेसर बनले जाऊ शकते. यासाठी अनेक विद्यार्थी तयारी करत असतात. परंतु, असेही काही विद्यार्थी असतात. ज्यांना PHD विषयी माहिती नसते. त्यासर्वांसाठी आम्ही हा लेख घेऊण आलो आहोत. या लेखाद्वारे आपण पीएचडी म्हणजे काय? PHD चे फूल-फोरम, याची पात्रता व पीएचडी कशी करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पीएचडीविषयी संपूर्ण माहिती मिळेल. चला तर पाहुयात!

 

phd information in marathi
phd information in marathi
What is PHD in marathi? पीएचडी म्हणजे काय?


PHD ही एक डिग्री(पदवी) आहे. या डिग्रीला एखाद्या विशिष्ट विषयात मिळवले जाते. त्या विषयात खुप सखोल ज्ञान असल्यास किंवा त्या विशिष्ट विषयात एक्स्पर्ट असल्यास पीएचडी ही पदवी दिली जाते. यास शैक्षणिक क्षेत्रात सर्वात उच्च शिक्षण असे म्हटले जाते. एखाद्या विषयात सखोल रिसर्च व अभ्यास केल्यास पीएचडी या पदवी ने सन्मानित केले जाते. पीएचडी करून एखादे चांगले पद किंवा विद्यापीठात शिक्षक/प्रोफेसर बनले जाऊ शकते. जाप्रकारे एखाद्या मेडिकल स्पेशलिस्टला डॉक्टर म्हटले जाते. त्याचप्रकारे पीएचडी झालेल्या विद्यार्थ्यांना देखील त्यांचा विषयात सखोल ज्ञान असल्याने डॉक्टर असे म्हटले जाते. म्हणजे काही विद्यार्थी मेडिकल स्टुडेंट किंवा डॉक्टर नसले तरी त्यांचा नावापुढे डॉक्टर असे लिहले जाते. जसे की डॉ.अब्दुल कलाम(aeronautical engineering)

 
Phd Full Form in marathi- पीएचडीचे फुल फॉर्म काय आहे?

PHD चे full formDocter of philosophy” असे आहे. Phd केल्याने तुम्हाला Doctorate(डॉक्टोरेट) ची पदवी दिली जाते. ज्यामुळे तुमचा नावापुढे डॉ.(dr.) असे लिहिले जाते. तुम्हाला ज्या विषयात रस असेल त्या विषयात Phd करून तुम्ही Doctrate ची पदवी मिळवू शकता.

 Eligibility of phd in Marathi- पीएचडीसाठी पात्रता काय आहे?

पीएचडी करणे सोपे नसते. म्हणूनच, पीएचडी साथी admission घेण्याकरिता काही पात्रता निकष(criteria) आहेत. काही विद्यापीठांसाठी हे निकष थोडे वेगळे असू शकता. परंतु, बहुतेक विद्यापीठांत खालील प्रमाणे निकष आहेत.

ज्या विद्यार्थ्यांकडे मास्टर्स डिग्री असेल ते विद्यार्थी PHD साथी अॅडमिशन घेऊ शकता. या साथी वयाची मर्यादा नाही.

पीएचडी करण्यासाठी CGPA किंवा टक्केवारी नुसार देखील पात्रता ठरते. ही विद्यापीठांनुसार वेगवेगळी असू शकते. परंतु, सामान्यत: 55% एवढे गुण मास्टर्स डिग्रीत असायला हवेत.

इंजीनीरिंग किंवा टेक्नॉलजीसारख्या क्षेत्रात पीएचडी करण्यासाठी GATE(Graduate aptitude test in Engineering) ही परीक्षा गरजेची असते.

त्याचप्रमाणे, भारतात PHD करिता प्रवेशासाठी GATE, NET सारख्या आणखी काही एंट्रेन्स एक्झॅम घेण्यात येतात. त्याद्वारे तुम्ही पीएचडीसाठी अॅडमिशन घेऊ शकता.

 

 

 

पीएचडी कोणकोणत्या विषयात केली जाते?

 

पीएचडीसाठी विषयी हे, तुम्ही ज्या विषयात स्पेशलायजेशन केले आहे त्यावर आणि मास्टर्स करतांना निवडलेल्या स्पेशल विषयावर अवलंबून असते. तुम्ही खालील तक्त्यात शाखेनुसार विषय पाहू शकता.


शाखा PHD Courses
कृषीशास्त्र Ph.D. in Agricultural Science
कृषी Ph.D. in Agriculture
सिविल इंजीनीरिंग Ph.D. in Architecture
आर्किटेक्चर Ph.D. in Architecture
जैवतंत्रज्ञान Ph.D. in Biology
बिजनेस अॅडमिनिसट्रेशन Ph.D. in Business Administration
रसायनशास्त्र Ph.D. in Chemistry
वाणिज्य Ph.D. in Commerce
कम्प्युटर अॅप्लिकेशन Ph.D. in Computer Applications
डेन्टल सायन्स Ph.D. in Dentistry
डिझाइन Ph.D. in Design
LL.D Ph.D. in Doctor of Laws (LL.D)
शिक्षण Ph.D. in Education
इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग Ph.D. in Electrical Engineering
फॅशन डिझाइन Ph.D. in Fashion Design
होस्पिटलीटी

Ph.D. in Hospitality
पत्रकारिता Ph.D. in Journalism
कायदा Ph.D. in Law
मॅनेजमेंट स्टडीज Ph.D. in Management
कम्युनिकेशन Ph.D. in Mass Communication
गणित Ph.D. in Mathematics
नर्सिंग Ph.D. in Nursing
ऑर्थोडॉन्टिक्स Ph.D. in Orthodontics
पॅथॉलॉजी Ph.D. in Pathology
फार्मसी Ph.D. in Pharmacy
शारीरिक शिक्षण Ph.D. in Physical Education
भौतिकशास्त्र Ph.D. in Physics
सांख्यिकी Ph.D. in Statistics
पशुवैद्यकीय परजीवीशास्त्र Ph.D. in Veterinary Parasitology
पशुवैद्यकीय विज्ञान Ph.D. in Veterinary Science
प्राणीशास्त्र Ph.D. in Zoology

 

 

 

 

How to do phd in marathi? पीएचडी कशाप्रकारे केली जाते?

 

पीएचडीची पदवी मिळवण्यासाठी चार ते पाच वर्ष सखोल अभ्यास व परिश्रम करावे लागते. योग्य ते मार्गदर्शन व विषयाला जीवनाचा अतूट भाग बनवून आपण पीएचडी आनंदाने पूर्ण करू शकतो.

PHD करण्यासाठी लहानपणापासून आवळ असलेल्या विषयाची जाणीव आपणास असायला हवी. 12वी पर्यंत त्याच विषयात रस असल्याने त्याचा पाया भक्कम होऊ शकतो. 12 वीत चांगले गुण मिळवावे. पीएचडी करण्यासाठी खालील प्रक्रिया नक्की वाचा.पदवी प्राप्त करणे

12वी झाल्यानंतर तुम्ही आवडत्याविषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी त्याच संबंधित शाखेत पदवी घेऊ शकता. PHD करण्यासाठी पदवीधार असणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे.

उच्च पदवी(masters degree) प्राप्त करणे

पदवी सोबतच मास्टर्स डिग्री(उच्च पदवी) देखील Phd च्या पात्रतेसाठी आवश्यक असते. आपल्याला Phd करावयाचा विषयात specialization करण्यासाठी मास्टर्स करतांना त्याच विषयाची निवड करणे गरजेचं असते.

प्रवेश परीक्षा पास करणे

पीएचडीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना अॅडमिशन घेण्यासाठी सर्वप्रथम, प्रवेश परीक्षा द्यावी लागते. NTA(National Test Agency) द्वारे घेतली जाणारी UGC Net Exam ही मुख्य एंट्रेन्स एक्झॅम घेतली जाते. परंतु, JNU सारख्या विद्यापीठांत स्वत:चा JNU PhD Entrance सारखी परीक्षा घेण्यात येते. यासारखेच अनेक entrance exam आहेत. ज्यांना पास करून तुम्ही PHD साठी Admission घेऊ शकतात. हे देखील पहा:-Phd Entrance Test List

विद्यापीठ किंवा महाविद्यालयाची निवड

तुम्ही जर NTA मार्फत घेण्यात येणारी PHD प्रवेश पात्रता परीक्षा (UGC) पास झाले असल्यास, मेरीट-लिस्ट द्वारे कॉलेज सुचवले जातात. त्यात अॅडमिशन घेऊन तुम्ही Phd पूर्ण करू शकतात. एखाद्या विशिष्ट विद्यापीठ किंवा कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी त्यांचा प्रवेश परीक्षा देणे व चांगल्या गुणांनी पास करणे आवश्यक असते.

 

 

 

 

 

Jobs After Phd- पीएचडीनंतर कोणकोणते जॉब्स उपलब्ध आहेत?

 शैक्षणिक क्षेत्रात पीएचडी सर्वात वरचा स्तरावर आहे. एखाद्या विषयात एक्स्पर्ट असल्याने, PHd पदवीधारकांना मोठ-मोठे पॅकेज नौकरी उपलब्ध होते. तसेच डॉक्टर पदवी प्राप्त असल्याने सन्मानही प्राप्त होतो. पीएचडीधारकांना अनेक जॉब्स उपलब्ध असतात. जसे-


प्रोफेसर-

विषयात एक्स्पर्ट असल्याने, विविध विद्यापीठ किंवा मोठ-मोठे कॉलेज हे पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांना स्वत:च आमंत्रण देत असतात. चांगल्या पगारासह पुढील रिसर्चसाठी देखील मदत यातून होत असते.

 

सल्लागार

सखोल ज्ञान असल्याने नवनवीन शोध करण्यात पीएचडी धारकांना सल्लागार म्हणून देखील नेमण्यात येते. यामुळे कोणतीही रिसर्च लवकरात-लवकर पूर्ण होण्यात मदत होते. सल्लागार म्हणून पीएचडी धारकांची खूप गरज असते. कारण, त्याचाकडे खूप अधिक प्रमाणात रिसर्च डेटा असतो. व एखाद्या शंकेचे किंवा समस्येचे निवारण ते करू शकतात.

उद्योजक

पीएचडीधारकांना शैक्षणिक क्षेत्रासोबतच औद्योगिक क्षेत्रात देखील खूप डिमांड आहे. विविध औद्योगिक कंपन्या पीएचडीधारकांना मोठ्या पदावर कामावर ठेवतात. मार्केटिंग, डिजाइन व इंजीनीरिंग सारख्या क्षेत्रात पीएचडी झाल्यास स्वत: देखील उद्योजक बनण्यास मदत होते.

सरकारी नौकरी

पीएचडी धारकांना अनेक गवर्नमेंट जॉब्स उपलब्ध असतात. आवडत्या क्षेत्रात पीएचडी केल्यास त्या क्षेत्रासंबंधित गवर्नमेंट जॉब्स पीएचडी धारक मिळवू शकतात. प्रोफेसर, इंजीनियर, रिसर्चर, लीगल असिस्टंट अशा प्रकारचे सरकारी जॉब्स पीएचडी धारक मिळवू शकता.

 

 

FAQ about- PHD information in Marathi


पीएचडी म्हणजे काय?

पीएचडी ही एक पदवी असून, पीएचडीद्वारे एखाद्या विषयात स्पेशलायजेशन करता येते. पीएचडी धारकांना डॉक्टर या पदवीने देखील सन्मानित केले जाते.

पीएचडीचा फुल-फॉर्म काय आहे?

पीएचडीचा फुल-फॉर्म “docter of philosophy” हा आहे.

पीएचडी किती वर्षाची असते?

पीएचडीचा कालावधी साधारणत: 3 ते 8 वर्षापर्यंत असतो. तुम्ही ज्या क्षेत्रात पीएचडी करत आहात त्या क्षेत्राच्या आधारावर कालावधी अवलंबून असतो.

पीएचडीसाठी पात्रता काय आहे?

पीएचडीच्या पात्रतेसाठी ग्रॅजुएशन तसेच पोस्ट ग्रॅजुएशन पूर्ण असायला हवे. त्या सोबतच आवश्यक त्या प्रवेश परीक्षेत(entrance exam) चांगले गुण प्राप्त करावे लागते. त्यातून तुम्ही पीएचडीसाठी पात्र होतात.

 

 

 

 

 

तर मित्रांनो, Phd information in Marathi- पीएचडीविषयी संपूर्ण माहिती ह्या लेखात आपण पीएचडीविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. यात पीएचडी म्हणजे काय? पीएचडी साठी पात्रता, विषय तसेच पीएचडी कशाप्रकारे करता येऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली आहे. जर तुम्हाला याव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे आम्हाला नक्की विचारा. हा लेख आवडला असल्यास यास नक्की शेअर करा. धन्यवाद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: