MPSC information in Marathi- Mpsc परीक्षेची संपूर्ण माहिती

mpsc information in marathi


मित्रांनो, ह्या लेखात आपण Mpsc information in Marathi, म्हणजेच MPSC विषयी तसेच त्याद्वारे घेतल्या जाणार्‍या परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सध्या स्पर्धेचे युग आहे आहे. विविध क्षेत्रांत मोठ-मोठे पद मिळवण्याचे स्वप्न विद्यार्थी पाहत असतात. त्यातच MPSC च्या स्पर्धा परीक्षेची चर्चा देखील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांत होत असते. तसेच काहीजण गूगल वर सर्च करून mpsc विषयी माहिती शोधत असतात. त्या सर्वांसाठी आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. ह्या लेखात आपण एमपीएससी संस्था तसेच, त्यांच्याद्वारे घेतल्या जाणार्‍या परीक्षा व त्यांचा पात्रतेविषयी माहीत घेऊयात.


mpsc information in marathi
mpsc information in marathi




MPSC full Information in Marathi- एमपीएससी म्हणजे काय?


Mpsc ही एक संस्था किंवा एक भर्ती पोर्टल(Recruitment Portal) असून, महाराष्ट्रातील समाज सेवेच्या(सिविल सेवा) विविध पदांना योग्यतेने, अचूकतेने व नियमांनुसार भरण्याचे काम करीत असते. MPSC ची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून, महाराष्ट्रांतर्गत विविध पदांची भरती करण्याची प्रक्रिया पार पाडणे, हाच MPSC चा मुख्य उद्देश आहे. भरल्या जाणार्‍या पदांत  ,,क किंवा गट-1, गट-2 व गट-3 यांचा समावेश असतो. MPSC द्वारे भरल्या जाणार्‍या पदांत पुढील पदांचा समावेश असतो.


MPSC Full Form in Marathi- एमपीएससी चे फूल फॉर्म काय आहे?

Mpsc चे फुल फॉर्म Maharashtra Public Service commission असे असून, त्याचा मराठीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग” असा अर्थ होतो.








MPSC Exam Information in Marathi- एमपीएससी परीक्षा म्हणजे काय?

 

Mpsc ची परीक्षा ही UPSC तसेच इतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसारखीच घेतली जाते. MPSC परीक्षा पार करायची असल्यास, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत असे तीन टप्पे पार करावे लागतात. तसेच काही पदांत शारीरिक चाचणी देखील घेतली जाते. 



mpsc exam pattern in Marathi- एमपीएससी परीक्षेचे स्वरूप


पूर्व परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे भरतीच्या सुरुवातीची प्रक्रिया म्हणून पूर्व परीक्षा घेत असते. पूर्व परीक्षा ही objectives म्हणजेच बहुनिष्ट प्रश्नांच्या स्वरुपात घेणात येते. यात मुख्य: महाराष्ट्रावर आधारितच प्रश्न विचारले जातात. पूर्व परीक्षा पार करण्याची दोन पेपर मेरीटनुसार पास करावे लागतात. आणि त्या मेरीटद्वारेच मुख्य-परीक्षेस बसता येते. या परीक्षेत होणार्‍या दोन्ही पेपरांत Negative Marking(नकारात्मक गुण) लागू असतात. चुकीचे उत्तर दिल्यास, मिळालेल्या एका उत्तराचा गुणातून 25% गुण वजा केले जातात.

 

मुख्य परीक्षा

पूर्व परीक्षा पास करून व पात्रता यादीत आलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसता येते. ही परीक्षा लेखी स्वरूपाची असून जवळजवळ 6 पेपर यात होत असतात. यातील दोन पेपर हे भाषेचे तर, इतर सामान्य अध्ययनाचे(General Studies) असतात. सर्व पेपर हे मराठी किंवा इंग्रजी भाषेत घेतले जात असून, प्रत्येक पेपरास 3 तासांचा वेळ दिलेला असतो.

 

 

मुलाखत

पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा पास करून व पात्रता यादीत निवडून आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येते. यात शैक्षणिक अभ्यासाबरोबरच, मानसिक व विचार क्षमतेची परीक्षा घेतली जाते. मुलाखतीद्वारे निवडून आलेले उमेदवार हे योग्य त्या पदांवर नेमले जातात.

 

 






एमपीएससीमार्फत घेतल्या जाणार्‍या परीक्षा- mpsc exam full information in marathi

 


एमपीएससी मार्फत खालील परीक्षा घेतल्या जातात.-

 

·         MPSC State Services Examination - राज्य सेवा परीक्षा

·         MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B – सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब

·         MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा

·         MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा

·         MPSC Maharashtra Agricultural Services Examination - महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा

·         MPSC Clerk Typist Examination - लिपिक-टंकलेखक परीक्षा

·         MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam - दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा

·         MPSC Tax Assistant Examination - कर सहायक गट-क परीक्षा

·         MPSC Sales Tax Inspector Examination - विक्रीकर निरीक्षक परीक्षा

·         MPSC Police Sub-Inspector Examination - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

·         MPSC Maharashtra Forest Services Examination - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा

·         MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam - सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा

·         MPSC Assistant Examination - सहायक परीक्षा


(source:- Wikipedia)




एमपीएससीमार्फत भरली जाणारी पदे- Which posts has requirt by MPSC?



पदाचे गट पद Post Recruit by   Mpsc
गट-ब लेखा   अधिकारी, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा Accounting   Officer, Maharashtra Finance And Account Service
गट-ब सहायक   गटविकास अधिकारी Assistant   Block Development Officer
गट-अ विक्रीकर   सहायक आयुक्त Assistant   Commissioner Of Sales Tax
गट-ब सहायक   आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क Assistant   Commissioner, State Excise
गट-अ सहाय्यक   संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा Assistant   Director, Maharashtra Finance And Account Service
गट-अ सहाय्यक   संचालक, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता Assistant   Director, Skill Development, Employment And Entrepreneurship
गट-ब सहाय्यक   प्रादेशिक परिवहन अधिकारी Assistant   Regional Transport Officer
गट-अ गटविकास   अधिकारी Block   Development Officer
गट-अ मुख्याधिकारी,   महानगरपालिका/नगर परिषद Chief   Officer, Municipal Corporation / Municipal Parishad
गट-ब मुख्याधिकारी,   महानगरपालिका/नगर परिषद Chief   Officer, Municipal Corporation / Municipal Parishad
गट-अ उपमुख्य   कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी Deputy   Chief Executive Officer / Block Development Officer
गट-अ उपजिल्हाधिकारी Deputy   Collector
गट-ब उपशिक्षणाधिकारी,   महाराष्ट्र शिक्षण सेवा Deputy   Education Officer, Maharashtra Education Service
गट-अ उपनिबंधक   सहकारी संस्था Deputy   Registrar Co-operative Societies
गट-अ पोलीस   उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त Deputy   Superintendent Of Police / Assistant Commissioner Of Police
गट-ब उपअधीक्षक,   भूमी अभिलेख Deputy   Superintendent, Land Records
गट-ब उपअधीक्षक,   राज्य उत्पादन शुल्क Deputy   Superintendent, State Excise
गट-अ शिक्षणाधिकारी,   महाराष्ट्र शिक्षण सेवा Education   Officer, Maharashtra Education Service
उद्योग   अधिकारी, तांत्रिक Industry   Officer, Technical
गट-ब मंत्रालयाचे   विभाग अधिकारी Mantralaya   Section Officer
गट-ब नायब   तहसीलदार Naib   Tahsildar
गट-ब कौशल्य   विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी Skill   Development, Employment And Entrepreneurship Guiding Officer
गट-ब उपनिबंधक,   को-ऑप. सोसायट्या Sub-Registrar,   Co-Op. Societies
गट-अ राज्य   उत्पादन शुल्क अधीक्षक Superintendent   Of State Excise
गट-अ तहसीलदार Tahsildar







Mpsc Eligibility in Marathi- MPSC ची परीक्षा कोण देऊ शकतो?

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, विविध भरतीच्या, विविध परीक्षेस बसण्यासाठी काही पात्रता निकष आहेत. यात वय, शिक्षण, पदवी तसेच शारीरिक तंदुरुस्तीचे देखील निकष आहेत.


Age eligibily- वयोमर्यादा

एमपीएससीच्या परीक्षेस बसण्यासाठी उमेदवारांना वयाची अट दिली जाते. कमीत-कमी 19 वर्ष पूर्ण असलेले उमेदवारच MPSC ची परीक्षा देऊ शकता. तसेच,

मागासवर्गीय कमाल – ४३ वर्षे,

माजी सैंनिकांसाठी किमान 19 वर्षे व कमाल 43 (सामान्य श्रेणी) व 48 (मागासवर्गीय) अशी वयाची अट आहे.

अपंगत्व असलेल्या उमेदवारांस किमान वयोमर्यादा 19 तर कमाल वयोमर्यादा 45 वर्षे वयाची अट आहे.

खेळ कोटातून असलेल्यास उमेदवारांना देखील कमीतकमी 19 व जास्तीत जास्त 43 वर्षे वयाची अट आहे.


 

Education Requirment for Mpsc- एमपीएससी साठी शिक्षण किती लागते?

एमपीएससीच्या परीक्षेसाठी विविध शैक्षणिक पात्रता निकषांची गरज असते. प्रत्येक उमेदवारांना एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असायला हवी. काही पदांकरिता एखाद्या विशेष पदवीची किंवा डिप्लोमा कोर्सची गरज असते. तर काही पदांना कोणत्याही शाखेतील पदवीची आवश्यकता असते. पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी देखील MPSC परीक्षेस बसू शकतात. मराठी लिहिता वाचता येणे ही देखील उमेदवारांसाठी एक अट आहे.

 

 

Physical Test- शारीरिक चाचणी

एमपीएससीद्वारे भरल्या जाणार्‍या पदांत अशी अनेक पदे आहेत, ज्यांसाठी शारीरिक चाचणी घेणे गरजेचे असते. यात, शारीरिक ऊंची, छातीचे माप, धावणे, डोळ्यांची क्षमतेची तपासणी इ. समावेश असता.

 

 

 

Maximum Attempts- एमपीएससी परीक्षा किती वेळा देता येते?

 

MPSC ची परीक्षेस प्रयत्नांचे देखील काही निकष आहे. या निकषांनुसार, General category(सामान्य श्रेणी)तील उमेदवारांना एकूण 6 वेळा एमपीएससी परीक्षेचा प्रयत्न करता येईल. अनुसूचीत जाती व जमातीच्या (SC/ST) उमेदवारांना कितीही वेळा परीक्षेस बसता येते. तसेच OBC कॅटेगरीतील उमेदवार 9 वेळा MPSC ची परीक्षा देऊ शकता.








Mpsc Syllabus information in Marathi- 


कोणत्याही परीक्षेची तयारी करीत असतांना, परीक्षेच्या स्वरूप व सिल्याबस विषयी माहिती असणे महत्वाचे आहे. अभ्यास करीत असतांना काय आणि किती अभ्यास करणे? हे सिल्याबस समझल्याने कळते. सिल्याबस समझल्याने, कमी वेळात अधिक प्रभावीपणे अभ्यास होतो. एमपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम हा खूप मोठा असल्याने योग्य नियोजनानेच त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्यासाठी एमपीएससीचा सिलेबस समझने गरजेचे आहे. तुम्ही खालील PDF Download करून एमपीएससीचा syllabus विषयी माहिती घेऊ शकता व योग्य त्या नियोजनाने परीक्षेत चांगले गुण आणू शकता.


DOWNLOAD-


 

 

 

 

 

 

How to Apply for mpsc exam in marathi? एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज कसा करावा?

 

मित्रांनो तुम्हाला एमपीएससीविषयी माहिती मिळाली असेलच, आणि तुम्ही देखील परीक्षेत बसल्यास पात्र असल्यास तुम्ही एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पुढील क्रिया करू शकता -

1)  एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर भेट द्या.

2)  या वेबपेजवर तुम्हाला registration टॅब दिसेल. तिथेच, new user registration लिंकवर क्लिक करा.

3)  त्यानंतर ओपेन होणार्‍या वेबपेजवर तुम्हाला योग्य ती माहिती भरावी लागेल आणि त्यांनातर तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

 

काही दिवसांतच परीक्षेचा कालावधी व वेळ तुम्हाला ऑनलाइन कळविण्यात येते.

 

 

 

 






तर मित्रांनो, ह्या लेखात आपण mpsc information in marathi, म्हणजेच एमपीएससी विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. एमपीएससी म्हणजे काय? एमपीएससीमार्फत घेतल्या जाणार्‍या परीक्षा हे सर्व आपण ह्या लेखात पाहिले. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. धन्यवाद!

 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: